Ad will apear here
Next
नवा जिओफोन केवळ ५०१ रुपयांत

मुंबई : ‘जिओ’ने धमाकेदार मॉन्सून हंगामा ऑफर जाहीर केली असून, यामध्ये ग्राहकांना जुना फिचरफोन देऊन अवघ्या पाचशे एक रुपयांमध्ये नवा जिओफोन मिळणार आहे. २० जुलैला सायंकाळी पाच वाजल्यानंतर ही ऑफर सुरू होत आहे. भारताला ‘डेटा’शक्तीच्या जोरावर बदलण्याची मोहीम जिओने सुरू केली असून, मॉन्सून हंगामा ऑफरमुळे कोट्यवधी ग्राहक जिओ डिजिटलची सेवा घेतील,असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. 

देशात सुमारे ५० कोटीहून अधिक जण फीचरफोनचा वापर इंटरनेटविना करीत आहेत. त्यांना परवडण्याजोगी सेवा नसल्याने त्यांच्यासाठी डिजिटल लाईफची दारे बंद आहेत. जिओ आणि जिओफोन यामध्ये बदल घडवत आहेत. केवळ स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेले अॅप्स नव्या जिओफोनमध्ये असून, यामध्ये फेसबुक, व्हॉट्‌सअॅप आणि यूट्यूबचा समावेश आहे. जिओफोन ग्राहकांना १५ ऑगस्टपासून सर्व अॅप्स उपलब्ध होतील. 

अखंडित फोर जी  सेवा आणि व्हॉईस कमांड फीचरमुळे जिओफोनमध्ये फेसबुक, व्हॉट्‌सअॅप आणि यूट्यूब यांचा वापर अतिशय सहज आणि साध्यासोप्या पद्धतीने करता येईल. व्हॉईस कमांड फीचरचा वापर करुन ग्राहक कॉल करणे, संदेश पाठविणे, इंटरनेटवर सर्च करणे, संगीत ऐकणे, व्हिडिओ पाहणे, तसेच सर्व अॅप्लिकेशनचा वापर करु शकतील. जिओफोनमध्ये असलेल्या इतर अॅप्समुळे नवा व्यवसाय व संधी, शिक्षण, रोजगारनिर्मिती, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या सेवा एका क्लिकवर मिळतील. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZPRBQ
Similar Posts
‘जिओ’ला दोन वर्षे पूर्ण मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘जिओ नेटवर्क’ने अत्यंत स्वस्त दरात मोबाईल डेटा उपलब्ध करून दिल्यामुळे देशातील मासिक डेटावापर २० कोटी जीबीवरून तब्बल ३७० कोटी जीबीवर पोहोचला आहे. एकट्या जिओचे ग्राहक त्यामधील २४० कोटी जीबी डेटाचा वापर करत आहेत. मोबाइल डेटा वापराबाबत भारत १५५ व्या स्थानावावरून पहिल्या क्रमांकावर आला आहे
‘जिओ’ ला वार्षिक ७२३ कोटींचा नफा मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची मोबाईल सेवा प्रदाता कंपनी ‘जिओ’ने या आर्थिक वर्षात सातशे २३ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. मार्च अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत तिने पाचशे १० कोटींचा नफा कमावला आहे.
‘जिओ’तर्फे ‘हॅलो जिओ पोस्टपेड’ची घोषणा मुंबई : रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (जिओ) नव्या पोस्टपेड योजनेची घोषणा केली असून, भारतातील पोस्टपेड सेवेत नवे बदल आणण्याचे आश्‍वासन कंपनीने दिले आहे. नवी जिओ पोस्टपेड सेवा सर्व ग्राहकांसाठी १५ मे २०१८पासून उपलब्ध होईल.
जिओफोनवरही आता फेसबुक मुंबई : फेसबुक हे स्मार्टफोन जिओफोनवर वापरणे शक्य होणार आहे. ‘न्यू व्हर्जन ऑफ फेसबुक अॅप’ हे जिओच्या ‘KaiOs’ हे वेब बेस ऑपरेटींग सिस्टिमवर आधारीत आहे. जिओफोनसाठी हे विशेष अॅप्लिकेशन उपलब्ध या ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language